मनाचं सौंदर्य

  • 4.4k
  • 1.2k

चिमण्यांचा चिवचिवाट...कपात वाफाळणारा चहा....आणि शांत हे अनुभवणारी समिधा....हे नेहमीचंच समीकरण झालं होतं......नुकताच सूर्य आपले डोके वर काढत होता. थांब मी येतोय असं समिधाला सांगत होता. तीही चहाच्या एका एका घोटासोबत त्याच्या धडपडीला दाद देत होती. हेतर रोजचंच होत. मनापासून सजवलेल्या गॅलरीत तिला सकाळचा चहा घेण्यात जी तृप्ती आणि समाधान मिळायचं ते फक्त तिलाच माहिती होतं.तसं काही दिवसांपूर्वी ती इथे शिफ्ट झाली होती. या गॅलरीत तासनतास बसून राहायचं. पुस्तक वाचायची गाणी ऐकायची तिला खूप सवय होती. कामही तिला तिथेच बसून करायला आवडायचं. आई बाबा कधी आलेच तिचे तर आई नेहमी