नंदिनी - केस ऑफ ब्रुटल मेंटालिटी.?

  • 7.4k
  • 2.5k

सकाळी...... सचिन जो की, एक पोलिस उप- निरीक्षक आहे. त्याला एक कॉल येतो. कॉल कॉन्स्टेबल ऐश्वर्याचा असतो. काहीतरी घडल्याची माहिती त्या देतात आणि एका पत्त्यावर लगेच पोहचायला सांगतात. सचिन तडक तिकडे जायला निघतो. तो एश्वर्याने दिलेल्या पत्त्यावर पोहचतो. एक स्त्री तिथं निर्वस्त्र पडून असल्याची माहिती त्याला कॉन्स्टेबल एश्वर्या देतात. तो येईपर्यंत कॉन्स्टेबल ऐश्वर्याने सगळं व्यवस्थित सांभाळलं असतं. इंक्वायरी केली असता, तिला तिथे कोणी तरी टाकून गेल्याचं समजतं. तिला लगेच उपचारासाठी रूग्णालयात रवाना केलं जातं. तिचा क्रूरपणे सामूहिक बलात्कार करुन, तिच्या प्रायव्हेट पार्टला इजा करण्यात आल्याचं, डॉक्टर सचिनला सांगतात. सचिनच्या डोळ्यांपुढे बालपणीच्या अशाच एका घडलेल्या प्रकाराचे दृश्य येतात. जिथून तो प्रेरित