श्वास असेपर्यंत - भाग ५

  • 5.5k
  • 2.2k

यंदा च वर्ष म्हणजे मॅट्रिक च वर्ष होतं.अभ्यास कसा करायचा,इतरांशी कसं बोलायचं,नीटनेटकी ठेवण कशी ठेवायची इत्यादी चांगल्या सवयी वसतिगृहात लागल्या होत्या. शहरी मित्र,गावातील मित्र,शाळेतील सरांशी पण चांगलं जमत असायचं. वसतिगृहात सुद्धा मोठ्यांशी,छोट्यांशी मैत्री जमली होती. सर्व काही एकदम व्यवस्थित चाललं होतं. पावसाळा लागला,या वर्षीच्या अभ्यासाचा तडाका वाढवावा लागेल म्हणून सुरुवातीला अभ्यास जोरदार करायचा,असं मनात ठरवलं होतं.शाळा नियमित सुरू झाली. वसतिगृह सुद्धा नेमकेच सुरू झालेले होते. काही विद्यार्थी अजून वसतिगृहात आलेले नव्हते,तर काही आले होते. काही नवीन विध्यार्थी वसतिगृहात प्रवेश मिळवण्यासाठी येत होते, तर काही पालक आपल्या पाल्याला प्रवेश मिळतो