आठवणीच्या वाटेवरती - प्रकरण - १

  • 8.1k
  • 3.8k

रिमझिम पाऊस, हवेतील गारवा, आणि नेहमीच सोबतीला असणार एकांत आताशा निशिकांतला या सर्वांची सवय झाली होती. जुईला भेटल्यानंतर खरतर एकांत काय असतो, हे निशिकांत विसरून गेला होता. पण आज पुनः तोच एकांत सोबतीला होता. अशा छान पावसाळी वातावरणात जुईला miss करण खर तर त्याच्यासाठी मोठी परीक्षा होती पण त्याशिवाय त्याच्याकडे काही पर्याय नव्हता. का असं व्हाव त्याच्यासोबत? नात टिकवण्यासाठी तो कुठेही कमी पडला नव्हता. मग जुईने अचानक त्याला सोडण्याचा निर्णय का घ्यावा? खरतर याच विचारांच्या तंद्रीत निशिकांत गुंतला होता. अचानक आईचा आवाज आला आणि तो दचकला. आईला प्रतिसाद देताना त्याचा आवाज अचानक रडवेला झाला. आईच्या लक्षात ही