आठवणीच्या वाटेवरती - प्रकरण - ७

  • 4k
  • 1
  • 1.1k

जुई आणि निशिकांत दोघेही एकाचवेळी फोनवर बोलल्यामुळे त्यांना थोडं गोंधळल्यासारख झालं. दोघेही एकमेकांचे आवाज इतक्या वर्षानंतर ऐकत होते. निशिकांतने पुन्हा एकदा 'जुई' असा आवाज दिला, पण त्यावेळी जयकडे फोन होता. जुईने फोन स्वत:चा समजून उचलल्यामुळे गोंधळ झाला हे जयला समजल. जय आणि जुई ची रिंगटोन सारखीच होती. जुईला विश्वास बसेना की ती निशी सोबत बोलली. अजून तसाच आवाज, तशीच नाव घेण्याची सवय. काहीच बदल नाही निशीमध्ये. जय निशिकांतशी बोलत होता; निशिकांतने त्याला विचारलं, "आता जी मुलगी फोनवर होती ती कोण होती?" जय म्हणाला, "अरे ती जुई माझी ज्युनियर जुई कदम. काही म्हणाली का ती तुला?" "नाही रे दा, मी सहज