वाटसरु

  • 20.5k
  • 6.8k

कधी नव्हे ते आज माझी नेहमीची बस केवळ पाच मिनिटं उशीर झाल्यामुळे चुकली. गेली दोन वर्षे मी या भागात काम करीत आहे आणि मला वरचेवर शोरापुर येथे यावे लागते . अम्मापूर येथून येण्याजाण्याच्या माझ्या बसच्या वेळा ठरलेल्या आहेत. आज मात्र तालुका डेव्हलपमेंट बोर्ड व बॅंकेच्या कामात अधिक वेळ गेल्याने थोडासा उशीर झाला. आता मी शोरापूर - नारायणपूर या बसने निघालो होतो. ही बस केवळ अम्मापूर फाट्या पर्यंत. जाणार आहे. तेथून पुढचे सहा किलोमीटर अंतर मला पायीच जावे लागणार आहे. वाट माहिती ची आहे पण पायाखालची नाही म्हणून थोडी चिंता. या तंद्रीत असतांनाच " ओsss पुनावाले साsssब अम्मापूर