ॲ लि बी. ( प्रकरण २ )

  • 11.7k
  • 7.4k

ॲलिबीप्रकरण २.(©अभय बापट)पाणिनी पटवर्धन झपाट्याने ऑफिस मधे आला तेव्हा सौम्या सोहोनी टपालातून आलेली पत्रे बघत होती.“ तुम्ही चक्क लौकर आलाय आज.” ती म्हणाली.“ मी आजची वर्तमान पत्रे जरा बारकाईने पाहण्यासाठी आलोय लौकर.”“ वर्तमान पत्रांचे काय?”“ काल मध्यरात्री नंतर मला रिटेनर म्हणून दोन हजाराच्या दोन नोटा आणि आणखी एका नोटेचा एक तुकडा मिळाला.एका बुरखाधारी स्त्री बरोबर माझी उत्कंठावर्धक अशी भेट झाली.आणि तिच्या बरोबरचा तो माणूस. सतत काहीतरी काळजीत असल्यासारखा होता.त्याने सांगितलं की आजच्या वर्तमान पत्रात काहीतरी सनसनाटी बातमी आहे.”“ आणि तुम्हाला ती सापडली नाहीये असंच ना?” सौम्या ने विचारले.“ खरं म्हणजे मी ती बघितली नाहीये.” “ कामातच सगळा दिवस निघून जातो.”“