चुकीचे पाऊल! - ०६

  • 7k
  • 4.1k

आता पर्यंत आपण बघीतले. भितीपोटी मी माझ्या वेदना दाबल्या. पण, लैंगिकता शिक्षण गटाच्या माहितीवरून माझ्यासोबत चुकीचे घडले असल्याची खात्री मला पटली आणि मी प्रियंका गावडे यांच्या समोर हंबरडा फोडला! आता पुढे..! त्यांनी मला जवळ घेत शांत केले. "बेटा, आता तू ठीक आहेस ना?" : प्रियांका गावडे यांनी आपुलकीने विचारपूस केली. त्यांच्या या प्रश्नावर मी होकारार्थी मान हलवली. त्या मायेच्या स्पर्शाने मला सुरक्षित वाटले आणि माझ्या ओठांवरील हास्याने याची ग्वाही दिली. कदाचित ते इतक्या दिवसांतून मिळालेल्या सुरक्षिततेची साक्षच देत असावे! कारण, माझ्या घरी आजवर कोणी मला समजावून सांगण्याच्या भानगडीतंच पडले नव्हते. ना भितीपोटी मी कधी या विषयी आईसोबत बोलण्याचे धाडस केले!