चुकीचे पाऊल! - ०७

  • 7.1k
  • 4k

आता पर्यंत आपण बघीतले.प्रियांका गावडे आणि माझ्यात झालेल्या संवादाने मला सुरक्षितता वाटली. आमच्यातील संभाषण संपवून वर्गाच्या दिशेने जायला निघताच पोटात कळ उठली आणि मी जागीच कोसळले!आता पुढे..!मला असे धाडकन जमिनीवर कोसळलेले बघून प्रियांका गावडे घाबरल्या! त्यांनी तात्काळ सोबत आलेला चिकित्सक गट आत बोलावून घेतला. मला उचलून आत एका बाकावर आडवे झोपवण्यात आले.बाकीचे सर्व काळजीत पडले. शाळेच्या परिसरात कुठल्याही विद्यार्थ्याला काहीही दुखापत होणं, शाळेची जबाबदारी त्यामुळे अर्धी मंडळी त्याच काळजीत! बाकीच्यांना खरंच माझी काळजी वाटत होती आणि त्यातीलंच एक होत्या, प्रियांका गावडे मॅडम.डॉक्टरांनी माझी तपासणी केली आणि त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलले! त्यात कमालीची अस्वस्थता मला जाणवली. त्यांनी लगेच प्रियांका गावडे यांना