सांग ना रे मना (भाग 28)

  • 4.9k
  • 2.2k

मितेश कुठे नाही तो नक्की मुंबई कडे निघाला असेल सो तू लवकरात लवकर संयु च्या घरून तिचा फोन नंबर घे प्लिज फास्ट अस त्याने सांगितले. पल्लू मग संयु च्या घरी गेली तिच्या आई ला मितेश बद्दल सगळं सांगितले आणि तिचा नवीन नंबर मिळवला. पल्लू ने मग हा नंबर निनाद ला सेंड केला. संयु मुंबईत कुठे आहे तो पत्ता ही दिला. मग निनाद मितेश ला कॉल करत होता पण रेंज नसल्याने त्याचा फोन लागत नवहता. निनाद सतत मितेश चा फोन ट्राय करत होता. इकडे मितेश संयु च्या आठवणीने आणि आपण तिच्याशी खूप चुकी चे वागलो या विचारानेच गिल्टी फील करत होता.