ॲ लि बी. - (प्रकरण १५) - शेवटचा भाग

  • 9k
  • 1
  • 3.7k

अॅलिबीप्रकरण १५ ( शेवटचे प्रकरण.)पाणिनी पटवर्धन त्याच्या ऑफिस मधे, केबिन मधे फिरत्या खुर्चीत आरामात बसला होता.समोर इन्स्पे.होळकर होता. “ या वेळेला माझ्या हातात तुझ्या अटकेचे वॉरंट आहे. ““ मला वाटत नाही की खांडेकर ना ते द्यायची इच्छा असेल,.” – पाणिनी.“ परत एकदा विचार कर पाणिनी, पूर्ण तयारीत आहोत आम्ही .”“ मोकाशी ने स्वतःच्या सही चा कबुली जबाब वर्तमान पत्राच्या संपादकांकडे स्वतः जाऊन सादर केलाय “ – पाणिनी.“ ही काय नाटकं आहेत पाणिनी ? तयारी कर, जायचयं आपल्याला , माझ्या हातात तुझ्या अटकेचे वॉरंट आहे. ““ ते शब्द उच्चारून झालेत तुझे मगाशी., मला नेलंस तर तूच अडचणीत येशील.” – पाणिनीपाणिनी ने