साक्षीदार - 6

  • 7.1k
  • 3.5k

साक्षीदारप्रकरण ६हृषीकेश बक्षी उंचापुरा आणि रूबाबदार माणूस होता त्याने स्वतःचा एक वेगळेपणा जपला होता. पक्षांमध्ये तर त्याचं स्थान चांगलं होतच पण सर्वसामान्य लोकांना तो स्वतःचा मित्र वाटत असे. लवकरच होणाऱ्या निवडणुकांच नियोजन करण्यात तो सध्या व्यस्त होता“सागरिका हॉटेल मध्ये झालेल्या होल्ड अप आणि गोळी बारा बद्दल मला तुमच्याशी बोलायचं आहे” हृषीकेश बक्षी ला पाणिनी म्हणाला. पण हृषीकेश ने त्यावर काही प्रतिसाद दिला नाही तेव्हा पाणिनी म्हणाला,“त्यावेळेला एका विवाहित स्त्री बरोबर तुम्ही तिथे उपस्थित होतात” आपल्या पोटात एखादा गुद्दा बसल्यावर माणसाला कसं होईल तसा हृषीकेश चा चेहरा झाला. त्याने आवंढा गिळला. मोठ्या प्रयत्नपूर्वक आपल्या चेहऱ्यावर कुठलेही भाव न आणता तो पाणिनीला