असाही एक त्रिकोण - भाग 1

  • 8.3k
  • 1
  • 4.1k

असाही एक त्रिकोण  भाग  १   दारावरची बेल वाजली आणि छोटा विनय बाबा आलेss  अस म्हणून दार उघडायला धावला. संध्याकाळची वेळ होती म्हणून त्यांची आई त्यांच्या मागे धावली पण तो पर्यन्त त्यांनी दार उघडलं होतं. दारात एक सुटा बुटातला अनोळखी माणूस उभा होता. विनय गोंधळला. त्याच्या आईने म्हणजे  वसुधाने कोण आलंय ते ओळखलं आणि मागेच थबकली आणि दारा आडून बघू लागली. “काय रे हरीचा मुलगा का तू. ? काय नाव तुझं. ?” – गृहस्थ “विनय हरीहर रायरीकर.” छोटा विनय उत्तरला.    “छान नाव आहे रे. बरं तुझा बाबा आहे का ?” – गृहस्थ. “नाही ते अजून ऑफिस मधून यायचे आहेत.”