आसाम मेघालय भ्रमंती - 3

  • 4.8k
  • 2.1k

#आसाम_मेघालय भ्रमंती ३ आमचे टूर गाईड केशव आणि तेजस यांनी सकाळी लवकर उठून नाश्ता उरकून आठ वाजता तयार रहायला सांगितले होते परंतु शिलाँगची सकाळ पाच सव्वापाचलाच होते हे लक्षात नव्हते.पहाटे साडेपाचला हॉटेलच्या खोलीत आलेल्या सूर्यकिरणांनी आम्हाला जागे केले.इथे ईशान्य राज्यांत सूर्योदय असाच पाच साडेपाचला होत असतो.लवकर जाग आल्याने लवकर तयार झालों आणि संपूर्ण हॉटेल पाहून घेतले.एम.क्राऊन हॉटेल खरंच सुरेख होते.सकाळच्या नाश्त्यात विविध पदार्थांची रेलचेल होती.प्रवासात झेपेल रुचेल आणि पचेल असा भरपेट नाश्ता करून आम्ही आठ वाजता तयार झालो.आज आम्ही तीनेक तासाचा प्रवास करून लिव्हिंग रुट ब्रीज अर्थात झाडांच्या मुळात झाडांचा आधार घेऊन बनवलेला पूल बघायला निघालो होतो.मेघालयात घनदाट जंगलात नदी