आसाम मेघालय भ्रमंती - Novels
by Pralhad K Dudhal
in
Marathi Travel stories
असं म्हणतात की प्रत्येक गोष्टीची वेळ यावी लागते, तुम्ही कितीही प्रयत्नवादी असला तरी विशिष्ट वेळ आल्याशिवाय तुमच्या मनाप्रमाणे गोष्टी घडत नाहीत.
काहींचे मत वेगळे असू शकते; पण मी तरी माझ्या आयुष्यात अनेकदा या गोष्टीचा अनुभव घेतला आहे....
मी ऑक्टोंबर २०१९ ला ...Read Moreघेतली तेव्हा पुढच्या जीवन प्रवासासाठी मनात काही योजना आखल्या होत्या.
चाळीस वर्षांच्या धकाधकीच्या धावपळीच्या आयुष्यात प्रथमच आता निवांत वेळ मिळणार होता.मनाप्रमाणे वागता येणार होते वर्षभरापूर्वी ड्रायव्हिंग शिकलो होतो.आता मस्त फिरायचे, देश विदेशात सहली करायच्या.जे जे करायचे राहून गेले आहे असे वाटते ते सर्व करायचे! त्या नियोजनाप्रमाणे निवृत्तीनंतर मिळणाऱ्या आर्थिक लाभाचा पहिला हप्ता बँकेत आलेल्या दिवशीच मी घाईघाईने केसरी टुरिस्ट कंपनीशी संपर्क साधला आणि १६ मे २०२० अर्थात आमच्या लग्नाच्या वाढदिवशी प्रस्थान करणाऱ्या युरोप ट्रीपचे आणि माझ्या पहिल्यावहिल्या परदेश ट्रीपचे बुकिंग केले!
कंपनीकडून मिळालेल्या सुचनेप्रमाणे दोघांचे पासपोर्ट व कागदपत्रे केसरीकडे जमा करून व्हिसासाठी वाट पहात असतानाच जगभरातून कोरोणाच्या बातम्या येऊ लागल्या....
मार्चमध्ये संपूर्ण देशात आणि परदेशात लॉकडाऊन लागले.आमचे परदेशवारीचे आणि हो पहिल्या विमान प्रवासाचे मनसुबे कोरोनाच्या लाटेत अक्षरशः वाहून गेले.पैशापरी पैसे अडकले आणि युरोप ट्रीपचे स्वप्न अधुरेच राहिले.
ट्रॅव्हल कंपनीने अडचणीत आल्याने ट्रीपसाठी भरलेल्या रकमेबाबत कानावर हात ठेवले आणि आम्ही भरलेल्या रकमेची एक क्रेडिट नोट मेलवर पाठवली.अर्थात सगळेच अनिश्चित झाले होते त्याला ते तरी काय करणार?
#आसाम_मेघालय भ्रमंती भाग १... असं म्हणतात की प्रत्येक गोष्टीची वेळ यावी लागते, तुम्ही कितीही प्रयत्नवादी असला तरी विशिष्ट वेळ आल्याशिवाय तुमच्या मनाप्रमाणे गोष्टी घडत नाहीत.काहींचे मत वेगळे असू शकते; पण मी तरी माझ्या आयुष्यात अनेकदा या गोष्टीचा अनुभव घेतला ...Read Moreमी ऑक्टोंबर २०१९ ला स्वेच्छानिवृत्ती घेतली तेव्हा पुढच्या जीवन प्रवासासाठी मनात काही योजना आखल्या होत्या. चाळीस वर्षांच्या धकाधकीच्या धावपळीच्या आयुष्यात प्रथमच आता निवांत वेळ मिळणार होता.मनाप्रमाणे वागता येणार होते वर्षभरापूर्वी ड्रायव्हिंग शिकलो होतो.आता मस्त फिरायचे, देश विदेशात सहली करायच्या.जे जे करायचे राहून गेले आहे असे वाटते ते सर्व करायचे! त्या नियोजनाप्रमाणे निवृत्तीनंतर मिळणाऱ्या आर्थिक लाभाचा पहिला हप्ता बँकेत आलेल्या दिवशीच
#आसाम_मेघालय भ्रमंती २ पुणे ते हैद्राबाद तसा तर केवळ एक तासाच्या आतच संपणारा प्रवास;पण आम्हा दोघांचाही हा पहिला विमान प्रवास होता त्यामुळे असेल;पण विमानात बसल्यापासून आत आणि बाहेर खिडकीतून आमच्या दृष्टिक्षेपात येणाऱ्या प्रत्येक घटना आणि दृष्याकडे अगदी लहान मुलाच्या ...Read Moreआम्ही दोघेही बघत होतो.आयुष्यातल्या पहिल्या एस टी प्रवासाचा किंवा पहिल्या रेल्वे प्रवासाचा आनंद जेव्हढा लहानपणी झाला होता किंबहुना त्यापेक्षा जास्तच आनंद या प्रवासात मिळाला असावा.वयाच्या साठीनंतर दुसरे बालपण सुरू होते असे म्हणतात ते काही खोटे नाही... असो...हैद्राबादच्या राजीव गांधी विमानतळावर उतरून आम्हाला कनेक्टेड विमान सुटणार होते त्या गेटला पोहोचायचे होते.मित्रांच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा सिक्युरिटी चेक, बॅग स्कॅनिंग आदी सोपस्कार पूर्ण करून
#आसाम_मेघालय भ्रमंती ३ आमचे टूर गाईड केशव आणि तेजस यांनी सकाळी लवकर उठून नाश्ता उरकून आठ वाजता तयार रहायला सांगितले होते परंतु शिलाँगची सकाळ पाच सव्वापाचलाच होते हे लक्षात नव्हते.पहाटे साडेपाचला हॉटेलच्या खोलीत आलेल्या सूर्यकिरणांनी आम्हाला जागे केले.इथे ईशान्य ...Read Moreसूर्योदय असाच पाच साडेपाचला होत असतो.लवकर जाग आल्याने लवकर तयार झालों आणि संपूर्ण हॉटेल पाहून घेतले.एम.क्राऊन हॉटेल खरंच सुरेख होते.सकाळच्या नाश्त्यात विविध पदार्थांची रेलचेल होती.प्रवासात झेपेल रुचेल आणि पचेल असा भरपेट नाश्ता करून आम्ही आठ वाजता तयार झालो.आज आम्ही तीनेक तासाचा प्रवास करून लिव्हिंग रुट ब्रीज अर्थात झाडांच्या मुळात झाडांचा आधार घेऊन बनवलेला पूल बघायला निघालो होतो.मेघालयात घनदाट जंगलात नदी
#आसाम_मेघालय भ्रमंती ४ आज आमच्या ट्रिपचा तिसरा दिवस होता.सकाळी आठ वाजता एम क्राऊन हॉटेलचा मनसोक्त नाश्ता करून आम्ही आपापल्या गाड्यांमध्ये येऊन बसलो.आधीच्या कार्यक्रमाप्रमाणे सकाळी शिलाँग येथील प्रसिध्द डॉन बॉस्को म्युझियम बघणार होतो परंतु नुकत्याच शाळा सुरू झाल्याने म्युझियमकडे जाणाऱ्या ...Read Moreरस्त्यांवर प्रचंड ट्रॅफिक जाम झाले होते त्यामुळे म्युझियम संध्याकाळी बघायचे ठरले आणि आम्ही सोहरा अर्थात चेरापुंजी...सर्वात जास्त पर्जन्यमान असलेला प्रदेश बघण्यासाठी कूच केले. या भागात अनेक छोटे मोठे धबधबे आहेत.या सीझनला जरी ते कोरडे असेल तरी पावसाळ्यात नक्कीच त्यांचे सौदर्य अप्रतीम असणार, त्यापैकी एक भव्य एलिफंट फॉल्स आम्ही बघणार होतो.तीन टप्प्यात कोसळणाऱ्या या धबधब्याकडे जाण्यासाठी बऱ्याच ओबडधोबड पायऱ्या उतरून जाव्या
#आसाम_मेघालय भ्रमंती५ शिलाँगमध्ये आमच्या सहलीचे तिन्ही दिवस एम क्राऊन या एकाच हॉटेलात मुक्काम होता त्यामुळे लगेज बरोबर घेऊन फिरण्याचा प्रश्न नव्हता. मात्र आज सकाळी सहा वाजताच बॅग्स भरून खोलीबाहेर ठेवल्या. इथे नाश्ता उरकून आज इथून मुक्काम हलवून आम्ही काझिरंगाकडे ...Read Moreकरणार होतो.बरोबर साडेआठ वाजता आमचा हा प्रवास सुरू झाला.संपूर्ण सहलीतला हा सर्वात जास्त अंतराचा प्रवास होता. एकशे ऐंशी किलोमीटरच्या या प्रवासासाठी चार पाच तास सहज लागणार होते. दुपारी लंचसाठी एका ढाब्यावर ब्रेक वगळता सलग प्रवास झाला.काझिरंगा मधील हिरवाईने नटलेले रस्ते आमच्या स्वागतासाठी सज्ज होते.आता आम्ही काझिरंगामधील वन्य प्राण्यांच्या क्षेत्रातून चाललो होतो त्यामुळे ठिकठिकाणी स्पीड गन लावून वाहन वेगावर नियंत्रण आणले
#आसाम_मेघालय भ्रमंती ६ सकाळी उठून लगेज आवरून बाहेर ठेवले आणि नाष्टासाठी खोलोंग रेस्टॉरंट या डोंगर गुहेचा फिल देणाऱ्या हॉटेलच्या हॉलमध्ये आलो.भरपेट नाश्ता करून तिथे बाहेर असलेल्या भव्य टारझन द ऍप मैंन पुतळ्याबरोबर भरपूर फोटो काढले.एकूणच इथला परिसर मस्त होता ...Read Moreप्रवास सुरू झाला. काझिरंगा ते गुवाहटी हा प्रवास दोनशे किलोमीटरचा पल्ला होता त्यामुळें आजचा दिवस प्रवासातच जाणार होता.आमची सहल आता शेवटच्या टप्प्यात आली होती. प्रवासादरम्यान आमच्या कारचालकाशी गप्पा चालल्या होत्या.पर्यटन व्यवसायावर त्यांचे जीवन अवलंबून असल्याने लॉक डाऊन काळात त्यांच्या दैनंदिन आयुष्यावर फारच वाईट परिणाम झाल्याचे त्याच्या बोलण्यात जाणवले...गप्पा टप्पा करत आमचा प्रवास चालू होता.रस्त्यात कालाजुगी येथील प्रचंड मोठे शिवाचे मंदिर