अंकिलेश - एक प्रेमकथा - 8

  • 3.4k
  • 1.4k

८ @ डाॅ.अरूणा गावस्कर त्या दिवशी मला अंकिताच्या पर्समध्ये काय सापडावे? बसची दोन तिकिटे? नि त्या पॅथाॅलाॅजीच्या पुस्तकात त्याच दिवशीची रिसिट. केईएम जवळच्या बुक स्टोअरची. मला पोलिसांसारखे इंटरोगेशन आवडत नाही. पण आजकाल अंकिता थोडी गप्प गप्प वाटते. सुरेन्द्रला कुठला आलाय वेळ? ती त्या मुलाबरोबर तर गेली नसेल? त्या दिवशी मी काही बोलले नाही. थोडी सिच्युएशन शांत झाली की डोकं नीट चालतं. दुसऱ्या दिवशी अंकिता उठली तर तिला म्हणाले, "तू पॅथाॅलाॅजीत करणारेस पीजी?" "नो. मला नाही आवडत." "नाही, मग एकाच वेळी दोन दोन राॅबिन्सन वाचतेयस. एकच एडिशन. काल अजून एक तेच पुस्तक आणलेयस. नाही कदाचित नवीन मेथड असेल अभ्यासाची.." "अगं नाही..