होल्ड अप - प्रकरण 9

  • 4.4k
  • 2.8k

होल्ड अप प्रकरण ९ “ गुड इव्हिनिंग,” तो तिला म्हणाला. “ तुम्ही इथे येणे मी अपेक्षित केले नव्हते.” ती म्हणाली. पाणिनी फक्त हसला. “ ही जागा सापडली कशी तुम्हाला?” मरुशिका ने विचारलं. “ मागच्या वीस मिनिटात मला हा प्रश्न दुसऱ्यांदा विचारला गेलाय” पाणिनी म्हणाला. “ मला वाटतं, मला तुमच्याशी बोलावं लागेल पटवर्धन.” “ कधी? कुठे?” पाणिनी ने विचारलं. “ तुम्हाला माहितीच आहे, व्हिला नंबर तीन शेजारच्या इमारतीत खालच्या मजल्यावर आहे.तिथे माझं ऑफिस आहे, तिथे बसून आपल्याला खाजगी बोलता येईल.”—मरुशिका “ तुमच्या सेवेला हजर आहे.” पाणिनी म्हणाला. पाणिनी ला ती तिच्या ऑफिस मधे घेऊन गेली. महागड्या फर्निचर ने ते सजवलं होतं