होल्ड अप - प्रकरण 20

  • 4k
  • 1
  • 2.4k

प्रकरण २० दहा वाजता कोर्ट चालू झालं तेव्हा आधीच्या आठवड्यातल्या घडामोडींचे परिणाम जाणवायला लागले होते. पाणिनी उठून उभा राहिला. “ माझी कोर्टाला विनंती आहे की जो माणूस साक्षीदार नसेल तर तो या कोर्टात हजर राहणार नाही. “ आणि ज्या साक्षीदारांच्या साक्षी आधीच होऊन गेल्या आहेत,त्यांचे काय?” आरुष काणेकर, सरकारी वकील म्हणाला. “ तुम्ही जर खात्री देत असाल की त्या साक्षीदारांना पुन्हा साक्ष देण्यासाठी पाचारण केलं जाणार नाही, तर त्यांनी बसायला हरकत नाही. थोडक्यात साक्ष होऊनही कोर्टात बसणाऱ्याना मी पुन्हा साक्षीला बोलावून देणार नाही.” पाणिनी म्हणाला. “ ठीक आहे.ज्यांना साक्षीला बोलावले जाणार आहे ते सर्व लोक कोर्टाच्या बाहेरच बसतील.फक्त साक्षी पुरते