होल्ड अप - प्रकरण 28

  • 4.3k
  • 2.1k

होल्ड अप प्रकरण २८ “ तुम्हाला काही विचारायचं आहे? ” न्यायाधीशांनी काणेकर ना विचारलं.तेवढयात कोर्टाच्या मागे पुन्हा गलका झाला आणि पाणिनी ला दिसलं की एका तरुणीला घेऊन लेडी कॉंन्स्टेबल आत शिरत होती. “ मगाशी मी म्हणालो त्याप्रमाणे आरोपी इनामदार चा संबंध आम्ही अजून खुनाशी लावलेला नाही.त्यामुळे त्या गाडीत कोण बसले होते या बद्दल सुखात्मे काय म्हणते याच्याशी मला काही घेणे नाही. दुसरी गोष्ट म्हणजे पटवर्धन ना हवी असलेली सिया माथूर इथे अत्ता हजर झाली आहे.” काणेकर म्हणाला. पाणिनी म्हणाला, “मी पिसेच्या साक्षीचे वेळी पिसे ला जे पॅड हातात धरायला दिले होते त्यावरचे ठसे आईना हॉटेल मधे तो उतरलेल्या रूम मधे