रामायण - अध्याय 1 - बालकाण्ड - 7

  • 3.2k
  • 1.3k

अध्याय 7 श्रीरामांची तीर्थयात्रा ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ धन्य रामायण सृष्टीं । धन्य वाल्मीकाचे वाग्वृष्टी ।अक्षरीं अक्षरपरिपाटी । दोष कोट्यनुकोटी नासती ॥ १ ॥नासती महापातकें । नासती द्वंद्वेदुःखे ।रामकथा ऐकतां हरिखें । सुख महासुखें थोरावे ॥ २ ॥येथोनि श्रीरामचरित्र । अपवित्रा करी अति पवित्र ।कथाकौतुक अति विचित्र । श्रोतीं सादर परिसावें ॥ ३ ॥ श्रीरामजन्माने लंकेत घडलेल्या अशुभसूचक घटना : श्रीराम जन्मला अयोध्यापुरीं । तंव वीज पडे लंकेवरी ।भूस्फोटन नगरद्वारीं । भूकंप नगरीं त्रिकेटेंसीं ॥ ४ ॥रावण जंव भद्रीं चढे । तंव मुकुट पायरीवरी पडे ।वायुघातें छत्र मोडे । सभेचे हुडे खचोनि पडती ॥ ५ ॥कुंभकर्णाच्या घरावरी । दिवाभीत घूं