Ramayan. book and story is written by MB (Official) in Marathi . This story is getting good reader response on Matrubharti app and web since it is published free to read for all readers online. Ramayan. is also popular in Spiritual Stories in Marathi and it is receiving from online readers very fast. Signup now to get access to this story.
रामायण. - Novels
by MB (Official)
in
Marathi Spiritual Stories
बालकाण्ड
अध्याय - 1
॥ श्रीसद्गुरवे रामचंद्राय नमः ॥
जातो वंशे रघूणां मुनिवरवचनात् ताटकां ताडयित्वा
कृत्वापुण्यामहल्यां त्रुटितहरधनुर्मैथिलावल्लभोऽभूत् ।
प्राप्यायोध्यां नियोगात् पितुरटविमगात् नाशयित्वा च वालिं
बध्वाब्धिं रामचंद्रो दलितदशमुखः सीतया युज्यमानः ॥ १ ॥
चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् ।
एकैकमक्षरं पुंसां महापातकनाशनम् ॥ २ ॥
श्रीगणेश वंदन
ॐ नमो अनादि आद्या । वेदवेदांतवेद्या ।
वंद्यांही परमवंद्या । स्वसंवेद्या श्रीगणेशा ॥ १ ॥
तुझें निर्धारतां रूप । केवळ अरूपाचे स्वरूप ।
तेथें अवयव कल्पितां अमूप । तंव कल्पनेचा लोप । स्वरूपीं तुझ्या ॥ २ ॥
यालागीं जैसा अससी तैसियासी । नमन साकार निराकारासी ।
तंव अंगत्व मुकले अंगासी । भज्यभजकासी अद्वैत ॥ ३ ॥
ज्ञानतेजें सतेज फरश । नित्यस्मरणाचा अंकुश ।
आनंदमोदकाचा सुरस । मुखीं देसी घांस निजभक्तां ॥ ४ ॥
ऐसें ऐकोन स्तवन । संतोषला गजानन ।
माझें वसवूनियां वदन । वक्ता वचन स्वयें झाला ॥ ५ ॥
ऐसा जाला सुप्रसन्न । तेणें विघ्नचि केलें निर्विघ्न ।
उन्मेखेंसीं बोलिला आपण । भावार्थरामायण चालवीं वेगीं ॥ ६ ॥
बालकाण्ड अध्याय - 1 ॥ श्रीसद्गुरवे रामचंद्राय नमः ॥ जातो वंशे रघूणां मुनिवरवचनात् ताटकां ताडयित्वाकृत्वापुण्यामहल्यां त्रुटितहरधनुर्मैथिलावल्लभोऽभूत् ।प्राप्यायोध्यां नियोगात् पितुरटविमगात् नाशयित्वा च वालिंबध्वाब्धिं रामचंद्रो दलितदशमुखः सीतया युज्यमानः ॥ १ ॥चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् ।एकैकमक्षरं पुंसां महापातकनाशनम् ॥ २ ॥ श्रीगणेश वंदन ...Read Moreनमो अनादि आद्या । वेदवेदांतवेद्या ।वंद्यांही परमवंद्या । स्वसंवेद्या श्रीगणेशा ॥ १ ॥तुझें निर्धारतां रूप । केवळ अरूपाचे स्वरूप ।तेथें अवयव कल्पितां अमूप । तंव कल्पनेचा लोप । स्वरूपीं तुझ्या ॥ २ ॥यालागीं जैसा अससी तैसियासी । नमन साकार निराकारासी ।तंव अंगत्व मुकले अंगासी । भज्यभजकासी अद्वैत ॥ ३ ॥ज्ञानतेजें सतेज फरश । नित्यस्मरणाचा अंकुश ।आनंदमोदकाचा सुरस । मुखीं देसी
अध्याय 2 ॥ श्रीसद्गुरु रामचंद्राय नमः ॥ यज्ञपुरुषाने दिलेल्या प्रसादाचे विभाग राजा पाहे राष्ट्र सकळ । तंव फिटले द्वंद्वदुःखदुष्काळ ।पाहिला सर्वत्र सुकाळ । अफळ ते सफळ वृक्ष झाले ॥ १ ॥प्रजा स्वानंदे निर्भर । गोगोधनां आनंद थोर ।अग्निहोत्रें घरोघर ...Read Moreयाग द्विजवर यजिती सुखें ॥ २ ॥पृथ्वी धनधान्यें परिपूर्ण । कोणा नाहीं दुःख दैन्य ।घरोघरीं वेदाध्ययन । हरिकीर्तन हरिभक्ती ॥ ३ ॥भूतळा येईल राघव । यालागीं वैकुंठींचें वैभव ।पुढे धाडिले जी सर्व । तेणें शोभा अपूर्व अयोध्येसीं ॥ ४ ॥ अयोध्येत इंद्राच्या अप्सरांचे आगमन राजा शोभे सिंहासनीं । अति आल्हाद राजभुवनीं ।आनंद न माये त्रिभुवनीं । तंव स्वर्गाहूनि आल्या देवांगना
अध्याय 3 ॥ श्रीसद्गुरु रामचंद्राय नमः ॥ कौसल्या, सुमित्रा व कैकेयी यांच्याकडून प्रसाद भक्षण : कैकेयी धरोनि पोटेसीं । कौसल्या संबोखी तियेसी ।तूं का व्यर्थ दुःखी होसी । आम्हां दोघींसी दुःख एक ॥१॥एकोदरा सख्या बहिणी । दो दुस्सर पाटणी ...Read Moreसख्या ॥२॥दोघीं नाही नित्य भेटी । दोघी नाही नित्य गोष्टी ।दोघीं नाहीं नित्य दृष्टी । मिथा चावटी सख्यत्वाची ॥३॥दोघी नाही नित्य संबंध । दोघीं नाही नित्य संवाद ।दोघीं नाहीं नित्य बोध । तो सख्यसंबंध अति मिथ्या ॥४॥दोघीं नाहीं एक सुख । त्या सख्या मानिती मूर्ख ।तूं एक करिसी व्यर्थ दुःख । आम्हां निजसुख एकत्वें ॥५॥आम्हां तुम्हां एक आहेवपण । आम्हां
अध्याय 4 ॥ श्रीसद्गुरु रामचंद्राय नमः ॥ कौसल्येचे डोहाळे : ऐकोनियां कथाश्रवण । ज्ञाते म्हणती अप्रमाण ।नव्हे हें मूळीचें निरूपण । तिहीं शिवरामायण पहावें ॥ १ ॥स्कंड पुसे अगस्तीप्रती । शिवभवानी राम जपती ।राम कोण तो त्रिजगतीं । यथास्थिती ...Read Moreसांगा ॥ २ ॥तो म्हणे श्रीराममहिमान । सांगावया मी अति दीन ।जेथें वेदां पडे मौन । तें वदावया वदन मज नाहीं ॥ ३ ॥तुझ्याचिं ऐसा प्रश्न । सदाशिवाप्रति जाण ।पार्वती पुसे आपण । श्रीराम कवण मज सांगा ॥ ४ ॥श्रीरामाची कोण स्थिती । कोण श्रीरामाची कीर्ती ।समूळ सांगा मजप्रती । पुसे अति प्रीती जगदंबा ॥ ५ ॥कोण श्रीरामाची ख्याती ।
अध्याय 5 ॥ श्रीसद्गुरुरामचंद्राय नमः ॥ कौसल्येचे डोहाळे : पूर्वकथेचे अनुसंधान । कौसल्यें उघडिले नयन ।डोहाळे पुसावसा जाण । राजा सावधान स्वयें जाला ॥ १ ॥कौसल्या रामगर्भें स्वरूपस्थिती । राजा प्रवृत्तिधर्में पुत्रार्थी ।दोहींच्या संवादाची प्रीती । डोहळे निश्चिती अवधारा ...Read More२ ॥राजा म्हणे स्वमुखें कांते । काय आवडीं आहे तूतें ।वेगीं सांग डोहळ्यांतें । सांडी परतें भ्रमासी ॥ ३ ॥येरी म्हणे मी अवघा राम । मजमाजी तंव कैंचा भ्रम ।अवतरलों पुरुषोत्तम । देवांचे श्रम फेडावया ॥ ४ ॥ऐकोनि शंकिजे रायें । म्हणे इसी जाहलें तरी काये ।आप आपणियातें पाहें । सावधान होय प्रिये तूं ॥ ५ ॥येरी म्हणे मी नव्हे