रामायण - अध्याय 1 - बालकाण्ड - 13

  • 2.3k
  • 981

अध्याय 13 सुबाहुनिर्दलनं ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ एह्येहि रजनीं वसाम शुभदर्शन ।अयं सिद्धाश्रमो नाम त्वत्प्रादाद्‌भविष्यति ॥१॥ सिद्धाश्रमात मुक्काम : विश्वामित्र म्हणे रामासी । सिद्धाश्रम नाम यासी ।येळे राहावें आजिचे निशीं । सिद्धाश्रमासी निजसिद्धी ॥१॥आम्ही तुम्ही केलिया वस्ती । या सिद्धाश्रमाची सिद्ध ख्याती ।विस्तारेल त्रिजगतीं । मम आश्रमाप्रति प्रभाते गमन ॥२॥ अस्त्र विद्याग्रहण : येथे सुखें निशा क्रमून । प्रभाते स्नानसंध्या करून ।विश्वामित्र म्हणे आपण । अस्त्रग्रहण करीं रामा ॥३॥वसिष्ठाज्ञेचा निर्धारू । अनुविद्येसी तूं सद्‌गुरूं ।तदर्थीं आल्हाद थोरू । श्रद्धासादरू रघुनाथ ॥४॥वंदोनि सद्‌गुरूचरण । कृतांजलि रामलक्ष्मण ।त्यासीं विश्वामित्र आपण । अस्त्रप्रदान प्रारंभी ॥५॥तो म्हणे हें अस्त्रभिग्रहण । त्रिशुद्धी व्हावें सावधान ।सबीजमंत्राचें