रामायण - अध्याय 1 - बालकाण्ड - 19

  • 2.7k
  • 1k

अध्याय 19 श्रीरामस्वरूप वर्णन ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ रामाविषयी सीतेची उत्कंठा : सीतेसी सांगती सखीजन । टळलें रावणाचें विघ्न ।तूं भाग्याची सभाग्य पूर्ण । आवडे तो आपण नृप लक्षीं ॥ १ ॥दळें बळें अति संपत्ती । धैर्य वीर्य यश कीर्ती ।सखिया दाविती भूपती । सीता ते नृपती मानीना ॥ २ ॥श्यामसुंदर निजमूर्ति । पती तो एक रघुपती ।सीतेनें निश्चय केला चित्तीं । वरकड निश्चितीं मानीना ॥ ३ ॥सभेसी बैसला रावण । धनुष्या न चढवेचि गुण ।राम करूं न शके वरण । जनकें पण केला कथिण ॥ ४ ॥ धनुर्भंगाच्या पणाबद्दल राजांना आवाहन : जो धनुष्यीं वाहील गुण । त्याचें म्यां