रामायण - अध्याय 1 - बालकाण्ड - 23

  • 2.5k
  • 1k

अध्याय 23 सीमान्तपूजन रुखवत व भोजन समारंभ ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ सीमान्तपूजन – भोजनसमारंभ सूर्यवंशींचे भूपती । असंख्य आणि अगाधकीर्ती ।तेर् म्यां सांगितले संकळिती । क्षमा श्रोती करावी ॥ १ ॥ एवमुक्तोऽथ जनकः तमुवाच कृतांजलेः ।श्रोतुमर्हसि धर्मज्ञ मत्कुलं शृण्वतां वर ॥ १ ॥प्रधानेश्वर वक्तव्यं कुलं निरवशेषतः ।वक्तव्यं कुलजातेन तन्निबोध नरेश्वर ॥ २ ॥ वसिष्ठें सूर्यवंशावळी । वर्णिली अति प्रांजळी ।जनक उठोन तये वेळीं । कृतांजळी विनवीत ॥ २ ॥ जनकाचें कुलवर्णन : माझिये कुळींचे भूपाळ । खातिवंत अति प्रबळ ।राउळें परिसावे सकळ । सकळकुळपर्यावो ॥ ३ ॥कन्यादानीं सकळ कुळ । सांगावें लागे स्वयें समूळ ।पहिले कुळीं निमी भूपाळ । त्याची