रामायण - अध्याय 2 - अयोध्याकाण्ड - 6

  • 2.1k
  • 849

अध्याय 6 कौसल्यासांत्वनं ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ कैकेय्युवाचराजा न कुपितो राम व्यसनं नास्य किंचनं ।किंचिन्मनोगतं त्वस्य त्वभ्दयान्नानुभाषते ॥१॥प्रियं त्वामप्रियं वक्तुं वाणी नास्य प्रवर्तते ।तदवश्यं त्वया कार्यं यदनेन श्रुतं मम ॥२॥एष मह्यं वरं दत्वा पुरा मामभिपूज्य च ।पश्चात्संतप्यतेःराजा यथान्यःप्राकृस्तथा ॥३॥ श्रीरामांनी शपथपूर्वक आश्वासन दिल्यानंतर कैकेयीकडून वरांचे वृत्तकथन : पूर्व प्रसंगी आपण । रामें वाहिली वसिष्ठाची आण ।तेणें कैकेयी सुखसंपन्न । पूर्वकथन तें सांगे ॥१॥रायासी नाहीं ज्वरादि अवस्था । नाहीं भूतसंचारता ।आणिक कांही नाहीं व्यथा । तुझी ममता बहु बाधी ॥२॥तें रायाचें मनोगत । सांगातां तुझें पोळेल चित्त ।यालागीं पैं नृपनाथ । साशंकित सांगावया ॥३॥तूं रायाचा प्रिय पूर्ण । प्रियापासीं अप्रिय वचन