रामायण - अध्याय 7 - उत्तरकांड - 47

  • 1.2k
  • 345

अध्याय 47 सीतेचे वनाभिगमन ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ परतीला पोहोचली : अयोनिजेच्या मुखकमळें । ऎसं वदतां सुमित्रेच्या बाळें ।नावाडी पाचारिला कुशळें । सुंदर नौका आणविली ॥१॥कैवर्ते नौका सुंदर पूर्ण । आणोनि म्हणे करा जी आरोहण ।धरणिजेसहित ऊर्मिलारमण । नावेवरी बैसला ॥२॥रथसहित तेधवां सूत । ऎलतीरीं राहोन त्वरीत ।पैलतीरीं दोघे उतरोनि तेथ । स्नानसंध्या सारिली ॥३॥ लक्ष्मणाचा दुखाःवेग : शोकें संतप्त लक्ष्मण । बोले जानकीप्रति सद्रद वचन ।म्हणे माते निमित्तधारी जाण । जनासारिखें श्रीराम आचरला ॥४॥मज जी जेथें येतें मरण । तरी पावतो कॄतकल्याण ।हें माझेनि दुःख न देखवे जाण । काय आपण करावें ॥५॥जरी मज मरण येतें । तरी मी