रामायण - अध्याय 7 - उत्तरकांड - 53

  • 1.3k
  • 423

अध्याय 53 नृगराजाची कथा ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ श्रीराम धरणिजाकांत । लक्ष्मणवचनें हर्षयुक्त ।होवोनि स्वानंदे डुल्लत । कथा सांगत अनेका ॥१॥श्रीराम म्हणे लक्ष्मणा । तुज गेलें असतां वना ।मागें चार दिवस राजकारणा । मन नाहीं प्रवर्तलें ॥२॥तरी आतां नगरीचे जन । बोलावी शेटे महाजन ।आणि पुरोहित प्रधान । राजकारणालागूनी ॥३॥जो देशींचा भूपती । होवोनि न करी राजनीती ।तो जाईल अधःपातीं । नृगरायासारिखें होईल ॥४॥लक्ष्मण म्हणे श्रीरघुनाथा । नृग हा कोण कां अधःपाता ।गेला काय कारण सर्वथा । तें मजप्रति सांगिजे ॥५॥नृग कोण देशींचा भूपती । कोणाचा पुत्र रघुपती ।काय चुकला म्हणोनि अधःपातीं । कोणे कर्मे जी गेला ॥६॥ऐकोनि लक्ष्मणाचें वचन