रामायण - अध्याय 7 - उत्तरकांड - 61

  • 1.3k
  • 387

अध्याय 61 श्रीरामाचे अगस्त्याश्रमांत गमन ॥ श्रीसद्‌गुरुरामचंद्राय नमः ॥ शत्रुघ्न गेला मधुपुरीसी । मागें श्रीराम भरत लक्ष्मणेसीं ।राज्य करितां अयोध्येसी । पुढें काय वर्तलें ॥१॥ रामांच्या अधर्मचरणानेच आपला लहानमुलगा मृत्यु पावला अशी एका ब्राह्मणाची शंका : कोणी एक द्विज पुण्य पवित्र । अग्निहोत्री महापंडित ।चारी वेद मुखोद्गत । धर्मीं तत्पर स्वधर्में ॥२॥ऐसा तो गुणसंपन्न । तयाचें बाळक पांचसात वर्षांचे जाण ।ते अकाळीं पावलें मरण । दुःख दारुण विप्रासी ॥३॥तेणें द्विजें घेवोनि बाळक । महाद्वारा आला करीत शोक ।स्नेहें रुदन करी देख । नाना विलापें कपाळपिटी ॥४॥म्हणे मी नाहीं आचरलों अधर्म । म्यां नाहीं केलें निंद्य कर्म ।वादीं छळिले नाहींत ब्राह्मण