१ तास भुताचा - भाग 25

  • 2.4k
  • 936

चेटकीन.... सन: 1901 आकाशात काळसर ढगां आडून , गोलसर चंद्रखाली पृथ्वीकडे पाहत होता. त्या अवाढव्य झाडाच्या काळसर आकृतीची छाया त्या तपकिरी मातिवर पडली होती. त्या झाडाचा जाडजुड खोड अंधारात बुडाला होता जस एक पायघोल कपडे घातलेला सैतान जणु उभा भासत होता. रातकिड्यांची किरकिर वाजत होती. थंडीचा महिना असल्याने गारठा व धुक पसरल होत. त्या बारीकश्या झोपडी भोवती गावातली काही सात आठ मांणस उभी होती प्रत्येकाच्या अंगावर एक हाफ सदरा, पांढरट धोतर होत. त्या झोपडीतुन बायकांच्या रडण्याचा शोकहिंत आवाज येत होता. जणु सुतक लागल होत घराला.त्या झोपडीच्या दरवाज्यातुन पुढे बारा फुट लांबीच्या हॉलमध्ये, शेणाने सारवलेल्या भुवईवर एका पांढरट चादरीवर, शंभर वर्ष