संजय - भाग 2

  • 3.3k
  • 1.4k

संजय भाग दोन आज ती कौरव मंडळी लहानाची मोठी होत होती. त्यांच्यावर कुसंस्कार पडत चालले होते शकुनीचे. शकुनी तसा बुडवायलाच लागला होता हस्तीनापुरला. तो षडयंत्र करीत होता हस्तीनापुरसोबत. परंतू ती बाब ब-याच हस्तीनापुरातील लोकांच्या लक्षात येत नव्हती. काहींच्या लक्षात येत होती. ते पर्यायानं धृतराष्ट्रला टोकतही असत. परंतू धृतराष्ट्र मी विवश आहे असा हवाला देवून त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करीत असे. अशाच टोकणा-यात होता संजय. संजय क्रिष्णाचा भक्त होता. तसं पाहता तो धार्मीकही होता. त्यातच तो नित्यनेमानं धृतराष्ट्रला समजावीत असे. सांगत असे की शकुनी आपल्या बाळांवर कुसंस्कार टाकतोय. त्याला थांबवावं. परंतू त्यावर धृतराष्ट्र आपल्या मुलांना ताकीद न देता त्यांच्या चुकांवर पांघरुण घालत