मोक्ष - एक आत्मा हिंड नारा - 17

  • 2.2k
  • 1.1k

पैका पाहिजे !" प्रथमच त्या आकृतीच्या तोंडून आवाज आला, तो आवाज ऐकून मंजूलालच्या पायाखालची जमिनीच फाटली, कानांचे पडदे फाटले ,छातीत कस धस्स झाल. एका म्हाता- या मांणसाच जस खोंकताना घशातून खस,खस खर्र , खर्र आवाज बाहेर पड़तो - तसा तो आवाज होता. घोगरा , खर्जातला - खसखसता , आवाज. त्या आज्ञाधारक आवाजासरशी ,गुलाम असल्यासारखा मंजूलालने होकारार्थी मान हळवली आणि हळकेच " हो !" असा हुंकार भरला. " पैका भेटल , पन त्या बदल्यात काय देशील !" " त..त्या बदल्यात !" मंजूलालच्या स्वरात भीति होती. आणि ही भीती ? हे आपल्याला काय होत आहे ? आपण असे घाबरत का आहोत ?