फिरून पुन्हा एकवार

  • 1.6k
  • 603

फिरून पुन्हा एकवार चैताली व प्राजक्ता किनार्यावर बसली होती. दूरवर एक जोडप बसल होत..तिकडे लक्ष जाताच चैताली दचकली . होय तो निश्चितच अजय होता तो पाठमोरा बसला होता. पण ती त्याला कुठेही ओळखू शकत होती. क्षणभरात तिच्या डोळ्यासमोर गेल्या वर्षभरापूर्वी घडलेली घटना उभी राहिली. दोघ समोरासमोर बसली होती. हातातला वाफाळणारा चहा तसाच हातात धरून शून्यात बघत होती.त्या चहासारखीच त्यांच्या मनात खदखद चालली होती. " अभय, आजकाल आपणात खूपच भांडण होतायत." " भांडण मी करतोय का?" " मग, मला भांडणाची आवड आहे?" " चैताली..रोज तुझी पिरपीर चालू असते..." " अरे..माझी ती पिरपीर आणि तूझी दिवसभर दादागीरी चालू असते त्याला काय म्हणायच?"