भगवद्गीता - अध्याय १८ (३)

  • 915
  • 252

भगवद्गीता अ.१८-३तू माझा जीवलग असल्याने मी तुला हे गुह्यतम ज्ञान सांगत आहे आणि तुझ्या हितासाठी सांगतो ते ऐक. तू माझा भक्त हो, माझी उपासना कर, मला नमस्कार कर, असे केलेस तर मी प्रतिज्ञेने तुला सांगतो की तू मला प्राप्त करशील. कारण तू माझा आवडता आहेस. तू अज्ञान सोडून मलाचं शरण ये. तू तसें केलेस तर मी तुला सर्व पापातून मुक्त करीन. तू याची अजिबात काळजी करू नकोस. ज्याच्या मनात भक्तिभाव नाही व जो तपाचरण करत नाही, ज्याला हे ऐकण्याची इच्छा नाही व जो मला मानत नाही अशा कोणालाही हे सांगू नये. जो हे परम रहस्य माझ्या भक्तांना सांगेल तो माझा