आठवणीतले लंच

  • 615
  • 168

आठवणीतलं लंच...    ही गोष्ट साधारणपणे  1998 सालातली आहे ,त्या काळी मी पुण्यातल्या वाकड सांगवी विभागात कार्यरत होतो.या भागात त्यावेळी मुख्यत्वे हिंजवडीत मोठ्या मोठ्या आयटी कंपन्या उभारल्या जात होत्या आणि त्या काळी टेलिकॉम  क्षेत्रात आमच्या  खात्याची मोनोपॉली होती,त्यामुळे अर्थातच या नव्याने विकसित होत असलेल्या भागात आमच्या टेलिकॉम विभागाच्या नेटवर्क उभारणीचे कामही तेवढ्याच वेगाने चालू होते.    मोठ्या प्रमाणात  बाहेर  कामे  चालू  होती त्यामुळे दिवसातले दहा दहा तास कामाच्या सुपरवाईझरी निमित्ताने आमची खूप भटकंती व्हायची    आठवड्यात एखाद्या दिवशी आम्ही त्या भागात नव्याने सुरू झालेल्या एखाद्या ढाब्यावर श्रमपरिहारासाठी जायचो.        कधी कधी खात्याच्या गाडीतून आम्ही सहासात जण लंचसाठीही अशा