कोंदण पर्व एक - भाग 29

  • 1.9k
  • 723

अंतर्नाद "गारवा... वाऱ्यावर भिर भिर भिर पारवा.. "ह्या अल्बम ची गाणी कानावर पडली आणि मी तल्लीन झालो.बाबांनी नवा टेपरेकॉर्डर आणला होता. काही भक्तीगीते, मराठी भावगीते आणि नव्या मराठी अल्बमच्या कॅसेट्स पण आणल्या होत्या. त्यातलं सौमित्रने लिहिलेल्या गारवा मधल्या गीतांच वेड मला लागलं होत. कवी कल्पना आणि त्यांच्या शब्दांचे खेळ कसे अचंबित करणारे असतात. ते शोधण्याचा मला नाद लागला होता. मराठी च्या पाठय पुस्तकातल्या कविता मला आवडायच्या पण त्यांचं रूप खूप अलंकारिक आणि जड शब्दांनी सजलेलं असायचं. हे वेगळं होतं. साध्या सोप्या शब्दात पण तितकंच प्रभावी."आकाश सारे मांडून तारे आता रुपेरी झालेत वारे " हे ऐकलं कि वाटायचं या उपर ते काय? पण पुढं परत.."कधी