सानिका - 2

  • 201
  • 78

भाग २ आपणं बघितलं :- जोशी कुटुंबातील खेळीमेळीचे वातावरण . त्यात भर म्हणजे त्यांच्या मुलीचा म्हणजे सानिका चा रिझल्ट. आता पुढे :- सानिका च्या रिझल्ट मुळे घरात आनंदी वातावरण निर्माण झालं होतं . सगळे खूप खुश होते . जोशी साहेबांनी मनीषा ताईंना म्हटलं ... " मनीषा ... अगं इतकी आनंदाची बातमी कळली आहे तर आज काहीतरी विशेष स्वयंपाक होऊन जाऊ दे . " " नाही हां बाबा ....आज बाहेर जाऊ जेवायला . मस्त मज्जा करू . दोन दिवस ब्रेक घ्यायचा विचार केला आहे मी . तर आज आपण बाहेर जाऊ आणि उद्या मी माझ्या मित्र मैत्रिणीं सोबत बाहेर जाणार , मग पुन्हा अभ्यासाला सुरुवात