कोंदण पर्व एक - भाग 41

  • 659
  • 336

आणखी एक मन माऊलाईच्या टेकडीच्या आधी लागणारा माळ. पावसाळ्यापासून ते सुरुवातीच्या सौम्य उन्हाळ्यापर्यंत हिरवागार होऊन जायचा. एरवी सुद्धा होतीच पण त्या काळात तो माळ म्हणजे माझी सगळ्यात जास्त आवडतीची जागा होऊन जात. एकदा श्वेता मला संध्याकाळी म्हणाली. "तुझ्यासोबत येते सकाळी पळायला."मी तीला बोललो "चल. पण व्यायामात disturb नाही करायचा.""नाही करत disturb बाबा येऊ तर देत." असं म्हणत ती आली तर खरं.पण त्यादिवशी तिने सुरुवातीपासूनच माझ्या व्यायामाची वात काही पेटू दिली नाही. तीला ते वातावरणच इतकं आवडलं कि ती एखाद्या कोकरागत त्या उघड्या माळावर उगवलेल्या गुढगाभर गवतात हुंदडत होती. मला तीला सावध करत न्याव लागतं होतं. थंड हवा आणि हलके हलके दवांच्या राशींचे विखूरलेले