भाग तीन " एक मिनिट ... माझं आधी ऐकून घ्या आणि मग तुमचा जो निर्णय असेल मला मान्य असेल ... please . बसा . " सरिता पुन्हा वळली तिने सागर कडे बघितलं . तिला त्याच्या डोळ्यात काहीतरी जाणवलं . ती आपल्या बाबांच्या शेजारी बसली ." मी त्या दिवसा साठी आपली सगळ्यांची माफी मागतो , माफी या साठी की कळतं नकळत मी सुद्धा त्या दिवशी त्या अपमानास्पद घटनेचा साक्षीदार होतो . पण जर मी त्या दिवशी इथे आलो नसतो तर एका खऱ्या हिऱ्याला जवळून बघण्याची संधी मिळाली नसती. त्या दिवशी मला अभय आणि त्याच्या घरच्यांचा भयंकर राग आला होता . पण ह्यांचं बोलणं