ते आठवताना...

  • 150
  • 57

"आज मी तुला असं शेवटचं भेटायला आलीये. "तिचं हे वाक्य खरंतर माझ्या खूप अंगावर यायला हवं होतं. पण हा परिणाम मला काहीसा अपेक्षित होता.मी टेकडी मागच्या दगडी खाणीच्या वर एका दगडावर बसून तिची वाट पाहत होतो. "संध्याकाळी टेकडीवर" असा निरोप तिने वहीतून पाठवलेला. मी अकरावीला होतो आणि ती पण. एकाच ट्युशनमध्ये पण शाळा वेगवेगळी असताना नववीत ओळख झाली होती. एकमेकांशी थोडं थोडं बोलणं होत मग त्याची जागा नाजूक भावनेने कधी घेतली आणि तो बंध(?) तयार झाला. मी काही देखणा आणि अति हुशार वैगरे नव्हतो. ती पण अभ्यासात साधारण पण चार चौघीत उठून दिसणाऱ्यातली होती.पण त्या वयात जो पाहिला कनेक्ट होतो