सौभाग्याची शपथ - भाग 1

  • 684
  • 315

EPISODE 1  सौभाग्याची शपथ         कथेत दाखवलेली वातावरणनिर्मीती , पात्र, स्थळ- सर्वकाही सत्य असलं तर घडणारी कथा काल्पनिक आहे -  ही कथा वाचकांनी लक्षात असूद्या , ह्या कथेचा मानवी जिवनाशी दूर दूर पर्यंत कोणताही संबंध नाही.                ठिकाण : सहार , अंधेरी (पूर्व) ,मुंबई..छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय  विमानतळ ..         वेळ सकाळी  : 9 वाजता..         सकाळच्या आकाशात उगवलेल्या सुर्यभानासमोरुन,  सफेद रंगाचा   लाल इंग्रजी अक्षरांतील एअरइंडीया  नावाचा प्लेन , आपल्या पुढच्या टोकदारा नाकाने - व दोन्ही पंखांनी हवेला चिरत वssssssssssशश्शस्स असा हवेला कापणारा आवाज करत खाली खाली येऊ  लागला ....