बाहेर पावसाची रिमझिम सुरू होती. काचेच्या खिडकीबाहेरचे जग धूसर झाले होते, पण हॉटेलच्या आतल्या एका कोपऱ्यातल्या टेबलावर मात्र एक वेगळीच शांतता पसरली होती. निनाद तिथे पोहोचला, तेव्हा समृद्धी आधीच येऊन बसली होती. तिच्या चेहऱ्यावर एक संमिश्र भाव होता—थोडी ओढ, थोडी हुरहूर. निनादला पाहताच तिच्या चेहऱ्यावर एक हलकेसे हसू उमटले."हॅलो!!! कशी आहेस...?? " निनादने आपली बॅग बाजूला ठेवत विचारले."हाय!!! मी बरी आहे. तू कसा आहेस? अरे... बस ना..." समृद्धीने समोरील रिकामी खुर्ची दाखवत म्हटले. निनाद बसला खरा, पण त्याचे लक्ष अजूनही मोबाईलच्या स्क्रीनवर आणि हातातील घड्याळाकडे होते.तिने त्याचा हा अस्वस्थपणा टिपला. निनादने विचारले, "तू मला असं अचानक कसं काय बोलावलं? काही