प्रत्येक घरात काय चाललंय माहितेय का?इकडं एक बाप असतो… पोरगं मजबूत व्हावं म्हणून दिवसभर कडक राहणारा… कठोर राहण्याचा प्रयत्न करणारा.आणि तिकडं एक पोरगं असतं… जे आयुष्यभर फक्त एवढंच दाखवायचा प्रयत्न करत असतं ‘बाबा, मी वाईट नाही रे… मी योग्य आहे… तुमच्या अभिमानाचा लायकआहे…पण गंमत बघा… दोघांनाही एकमेकांवर प्रेम असतं… फक्त दाखवता येत नाही! काय करणार, इथंच तर सगळं गणित बिघडलं आहे बापाला वाटतं जास्त प्रेम दाखवलं तर पोरगं बिघडेल…आणि पोराला वाटतं अजून काहीतरी मोठं केलं तरच बाबा खुश होईल… अहो आई-बापांनो… एक गोष्ट लक्षात घ्या…पोरगं हसतंय म्हणून ते आनंदात आहे असं नसतं बरं का…!आतून काय वादळ चाललंय त्याच्या मनात, हे