️ वाचकांसाठी महत्त्वाची सूचना(या कथेचा प्रवाह काही ठिकाणी खूप वेगवान आणि थेट वाटू शकतो. पण ही घाई नसून, वाचकांचा थरार आणि उत्सुकता शेवटपर्यंत टिकून राहावी यासाठी मुद्दाम वापरलेली ही एक विशिष्ट 'लेखनशैली' (Writing Style) आहे. पाठोपाठ येणारे भयानक प्रसंग तुम्हाला श्वास रोखून धरायला लावतील, हाच या वेगवान मांडणीमागचा उद्देश आहे.(सदर कथा निव्वळ मनोरंजनासाठी असून सर्व पात्रे आणि घटना काल्पनिक आहेत.)अंधारी रात्र, कोसळणारा मुसळधार पाऊस आणि कोकणातल्या एका निर्जन टेकडीवर उभा असलेला शंभर वर्ष जुना 'भार्गव विला'. विशाल आणि अर्णव हे दोन तरुण लेखक शांततेत एका नवीन पुस्तकाचे लेखन करण्यासाठी या बंगल्यात राहायला आले होते. बंगल्याचा इतिहास तसा गूढ होता, पण शहरात