पावसाळा म्हटलं की सर्व जण घरात दडून बसतात..मात्र ज्यांच्याकडे काम करण्याशिवाय पर्याय नाही अशा लोकांना जीव मुठीत धरून आपापल्या कामावर जावचं लागतं.मग भलेही त्यांच मन असो किंवा नाही...आणि अशाच पावसाच्या दिवसांमध्ये तो तिला आपल्या गाडीतून फरफटत घेऊन जात होता,.. तिने जीव तोडून कितीही सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या पाषाण हृदई डेविल ला काडी मात्र फरक पडत नव्हता..ती स्वतःचं म्हणणं पटवून देण्यासाठी हर एक प्रकारे प्रयत्न करत होती, परंतु आज तिच्या नशिबाचे धागेदोरे असे काही त्या डेवील च्या हातात लागले होते, की त्या धाग्यानी बांधून तिला घेऊन जात होता,..तिच्या रडण्याचा, डोळ्यातून पडणाऱ्या मोत्या सारख्या आंसू चा सुद्धा त्याच्यावर फरक पडत नव्हता.