भाग ४ आपण बघितलं :- शुभ्रा .. हे नाव त्याच्या कानावर पडताच तो त्या मुलीचं सगळं ऐकून घ्यायला तयार झाला ...आता पुढे :- अर्णव घरी येतो. त्याच्या कानात फक्त एकच नाव फिरत होतं ...शुभ्रा..... त्याचे जीव की प्राण होतं हे नाव , त्याच्या जीवनाचा आधार होत हे नाव , हे नाव ऐकताच त्याच्या डोळ्यासमोर तो निरागस सुंदर चेहरा येतो , जो चेहरा त्याने आपल्या मनात बसवून ठेवला आहे . घरी आल्यावर तो तडक त्या खोलीत जातो , जिथे तिचा फोटो लागलेला आणि त्याच्यासमोर त्यातने जिंकलेली अवॉर्ड्स . " तू का गेलीस मला सोडून.... सगळं मान्य केलं होते ना तुझं... मग ...हे बरोबर