️अभिजित ️3समोर जिजा उभी होती, आपल्या पदराने आपले ओले झालेले अंग झाकत होती.. भेदरलेल्या तिच्या डोळयांतून पाणी वाहत होते, शरीर भीतीने थरथरत होते... तिच्या कोवळ्या मनगटा वर त्या रानटी भीकाच्या बोटांचे ठसे उमटले होते... ते पाहून आबासाहेबांचे रक्त सळसळून उठले...."बस!!!.... बस झाल!... डोळे मिटून घेत त्यांनी आपल्या संतापाचा उद्रेक होण्यापासून अडवला... पण तरी ही तो संताप रोखला जात न्हवता...आज पर्यन्त त्यांना वाटतं होत आपण शांत राहिलो तर समोरचा ही शांत होईल पण नाही मल्लपूर वाल्यांना लाथेचीच भाषा समजते आणी त्यांना ज्या भाषेत समजत ते त्याच भाषेत त्यांना समजावून सांगणार होते...."अभिजित "... डोळे उघडत ते जोरात कडाडले..त्याचे कान हा आवाज ऐकून