रानवाटा - 1

  • 543
  • 198

रानवाटाभाग १ – अमावस्येची रात्रसन १९९८...सह्याद्रीच्या दाट जंगलात वसलेलं एक छोटंसं गाव...देवरान.गावात अवघी शंभर–दीडशे घरं.कच्चे रस्ते...मातीची घरं...संध्याकाळ होताच प्रत्येक घराच्या अंगणात मिणमिणते दिवे.पण या गावाची एक गोष्ट संपूर्ण परिसरात प्रसिद्ध होती.सूर्यास्तानंतर कोणताही गावकरी जंगलात पाऊल ठेवत नसे.कारण जंगलाच्या मध्यातून जाणारी एक अरुंद पायवाट होती..."रानवाट."गावातल्या प्रत्येक मुलाला लहानपणापासून एकच गोष्ट सांगितली जायची.«"रानवाटेवर रात्री कधीही जाऊ नका. तिथे माणसं हरवत नाहीत... त्यांची ओळख हरवते."»कोणी हसायचं...कोणी घाबरायचं...पण गावातला एकही माणूस त्या नियमाचं उल्लंघन करत नसे.---त्या वर्षी...आषाढ महिन्याची अमावस्या होती.आकाश काळ्या ढगांनी भरलं होतं.वारा विचित्र आवाज करत होता.गावाच्या टोकाला असलेल्या एका छोट्या घरातून एका स्त्रीच्या वेदनेच्या किंकाळ्या ऐकू येत होत्या."गौरीला प्रसूतीच्या वेदना सुरू