*जुन्या घराचा दरवाजा* लहानपणापासून आजी सांगायची, "आपल्या वाड्याच्या शेवटच्या खोलीचा दरवाजा कधीच उघडू नकोस."मी हसायचो "आजी, भूत असतात का खरंच?" आजी फक्त माळ्याकडे बोट दाखवायची आणि म्हणायची "रात्री 12 नंतर त्या दरवाज्यातून आवाज येतो."गेल्या महिन्यात आजी गेली. वाडा माझ्या नावावर झाला. पुण्यातली नोकरी सोडून मी गावाला आलो... तस मला कधी शहरात जायचच न्हवत.. बाप जादयाचीं इतकी प्रॉपर्टी असताना ही आज्जीनी मला बळच पुण्याला धाडल..म्हणायची इथं राहिलास तर तिची नजर तुझ्यावर राहील..कोण ती आणी कसली नजर तिने कधी सांगितलं नाही आणी मला ही जाणून घेण्यात इंटरेस्ट न्हवता..आज्जी गेली आणी मी गावी परतलो..पुण्यात त्या तुंडपूज्या पगारात भागत न्हवते.. आणी आत्ता तसे गाव देखील गाव राहील