फक्त तुझ्याचसाठी....रात्र...मुंबईच्या चमचमणाऱ्या दिव्यांपासून दूर...एक असा रस्ता होता, जिथे फक्त काळोखाचं राज्य होतं.आकाशात काळे ढग जमा झाले होते.पावसाचे छोटे छोटे थेंब काळ्या रस्त्यावर पडत होते.त्या शांततेला भेदत एक काळी आलिशान कार वेगाने पुढे जात होती.कारच्या मागच्या सीटवर बसलेला तरुण लॅपटॉपवर काही फाईल्स पाहत होता.चेहऱ्यावर नेहमीसारखी शांतता...डोळ्यांत तीक्ष्ण नजर...आणि हातात ब्लॅक कॉफीचा कप.आर्यवीर खुराणा.खुराणा ग्रुपचा मालक.ज्याच्या नावाने शेअर मार्केटमध्ये हालचाल व्हायची.ज्याच्यासोबत व्यवसाय करणे म्हणजे अनेकांसाठी स्वप्न होतं...आणि ज्याच्याशी शत्रुत्व घेणं म्हणजे स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेणं."Sir..."समोर बसलेल्या बॉडीगार्डने अचानक आरशातून मागे पाहिलं."Something feels wrong."आर्यवीरने लॅपटॉप बंद केला नाही.फक्त शांत आवाजात विचारलं,"Wrong?""Yes sir... आपला रस्ता बदललेला आहे...आणि मागची गाडी गेल्या दहा मिनिटांपासून