अभिजित - ऐक हृदय स्पर्शी प्रेम कथा... - भाग 4

  • 195
  • 63

️अभिजित ️4पण त्याला माहित नाही इंग्रज चरख्या मुळे नाही तर काठी मुळे पळून गेलीत... असो आपल्याला काय करायचय?..जो पर्यन्त अहिंसेचें भूत त्याच्या मानगुटीवर आहे तो पर्यन्त आपण आपली चांदी करून घ्यायची बस ...प्रताप एटित उभा रहात म्हणाला..आणी हे भूत कधीच नाही उतरणार त्या आब्याच्या मानगुटी वरून तो गांधी भक्त जो हाय.. बज्या..आणी आपण कधी ते उतरू पण द्यायचे नाही.. त्याच्याच हातांनी त्याचा वंश संपवून टाकायचा.. आणी मल्लपूर सारख श्वेतपूर वर ही ताब्यात घ्यायच . बज्या लिहून ठेव,..या दोन गावावर एकदिवस माझ राज्य असेल,.. आणी या दोन गावांचा मी राजा असेल .. आणी तुम्ही भिकारडे लोक माझी प्रजा... दोन्ही हात हवेत पसरवून